बॉलिवूडचे रोमँटिक चित्रपट, ऍक्शन असणारे चित्रपट सर्वानाच आवडतात. हॉरर चित्रपटाचे चाहतेही काही कमी नाहीत. पण तुम्हांला भारतातील पहिला हॉरर चित्रपट कोणता होता हे माहितीय का? नाही ? तर मग आज जाणून घ्या कारण हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित होता.
चित्रपटातील मुख्य अभिनेता भूतांवर विश्वास ठेवत असे आणि त्याला या विषयावर चित्रपट बनवायचा होता आणि अखेर त्याने तो चित्रपट बनवला; तो चित्रपट म्हणजे ‘महल. महल’ चित्रपट ऑक्टोबर १९४९ मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनानंतर चित्रपटाला सुरुवातीला काही मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, नंतर हा चित्रपट त्या दशकातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला. बॉम्बे टॉकीजच्या इतिहासातील यशस्वी चित्रपट म्हणून तो स्मरणात राहिला.
१९४९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘महल’ हा एक भयपट आहे, जो सावक वाचा आणि अशोक कुमार यांनी बॉम्बे टॉकीज बॅनरखाली तयार केला आणि कमाल अमरोही यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
‘महल’ हा बॉलीवूडचा पहिला भयपट मानला जातो. या चित्रपटाची कथा एका श्रीमंत माणसाभोवती फिरते. एका जुन्या हवेलीत त्याची रहस्यमय महिलेशी भेट होते, जी मागील जन्मात त्याची प्रेयसी असल्याचं त्याला म्हणते. चित्रपटाची कथा जसजशी पुढे सरकते, तसतशा विचित्र घटना घडतात आणि हे पाहणं भयावह आहेत
‘महल’ चित्रपट आता पाहायचा असल्यास यूट्यूबवर तो उपलब्ध आहे. यूट्यूबवर या चित्रपटाचे १.६ दशलक्ष व्ह्युज आहेत. या चित्रपटात अशोक कुमार, मधुबाला, विजयालक्ष्मी आणि नासीर हुसेन यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.