राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  नेहमी वादांमुळे आणि अतरंगी स्वभावामुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची प्रकृती अचानक बिघडली आहे.  राखी सावंतचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाले आहेत. Viral bhayani ने याबाबतचे वृत्त दिले आहे. राखी सावंतला हृदयाशी संबंधित गंभीर आजार झाल्याची माहिती  माहिती समोर येत आहे. 

Viral bhayani ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राखी सावंतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राखी सावंत रुग्णालयात दाखल असून बेडवर झोपलेली दिसत आहे. राखी सावंतला हृदयाशी संबंधित  त्रास जाणवत असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांकडून अद्याप राखी सावंतच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही असे Viral bhayani  ने त्याच्या  इंस्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केले आहे.

राखी सावंत ही बॉलिबुडची ड्रामा क्वीन आहे. विविध कारणांमुळे राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. या बातमीमुळे राखीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group