२३ एप्रिल २०२६
मराठी तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करणार अभिनेता रितेश देशमुख हा कुठल्याना कुठल्या कारणाने चर्चेत आसतो. मात्र आता त्याची बायको जिनिलिया ही खास मराठ मोळ्या लूक मुळे चर्चेत आली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला.
या कार्यक्रमात जिनिलियाने खास पारंपारिक गुलाबी रंगाची साडी नेसली अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात रितेश देशमुख महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.
या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर 20 एप्रिल रोजी अगदी दिमाखात लाँच करण्यात आला. या सिनेमातील कलाकार या ट्रेलर लाँच कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान, या भव्य ट्रेलर लाँच कार्यक्रमात सर्वांच्या नजरा रितेश देशमुखची बायको जिनिलियावर खिळल्या होत्या. तिनं खास मराठमोळा लूक कॅरी केला होता. ऐतिहासिक 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरणप्रसंगी जिनिलियाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या साडीवर जिनिलिया देखणी दिसत होती. या सिल्क गुलाबी साडीचा काठ सोनेरी रंगाचा आहे.
या नऊवारी साडीवर तिनं मिनिमल सिंपल मेकअप लूक कॅरी केला होता. तिनं या साडीवर साजेसं असे सुंदर आणि नाजूक दागिने घातले होते. तसेच केसांचा अंबाडा बांधून तिनं गजरा माळला होता. तिनं बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्येही हजेरी लावली होती. तिनं गडद निळ्या रंगाची काठापदराची साडी नेसली होती. पारंपारिक लूकवर अभिनेत्री सुदंर दिसत होती.
दरम्यान, जिनिलिया देखील 'राजा शिवाजी' या चित्रपटाचा भाग आहे. या चित्रपटात दिग्गज कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिषेक बच्चन, संजय दत्त, बोमन इराणी, भाग्यश्री, विद्या बालन, महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रितेश देशमुखने केले आहे.
जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली या सिनेमाचे निर्माते ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख असून, हा सिनेमा 1 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक गाथा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महाराष्ट्र दिनी हा सिनेमा संपूर्ण जगभरात प्रदर्शित होत आहे.
Copyright ©2026 Bhramar