एसटीच्या जाहिरातीसाठी रितेश-जेनेलियाने किती मानधन घेतलं? अखेर परिवहन मंत्र्यांनीच केला मोठा खुलासा!
एसटीच्या जाहिरातीसाठी रितेश-जेनेलियाने किती मानधन घेतलं? अखेर परिवहन मंत्र्यांनीच केला मोठा खुलासा!
img
नितीशा कुलकर्णी







रितेश देशमुख- जेनेलिया ही जोडी सध्या खुपच चर्चेत आहे पण, तुम्हाला माहित आहे का? एसटीच्या जाहिरातीसाठी या बॉलिवूडच्या जोडीने किती माधन घेतले? या बाबत परिवहन मंत्र्यांनी काय सागीतले पहा. 

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचालकांवरील मराठी भाषेची सक्ती या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चिघळताना दिसत आहे.

अशातच झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध मुद्द्यांवर उत्तरे दिली. यावेळी त्यांना एसटीच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची निवडीबाबतही माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रचारासाठी किती मानधन घेतलं हे देखील सांगून टाकलं.

याबाबत बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, रितेश देशमुख यांनी मानधन घेण्यास नकार दिला असून, ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून त्यांनी नि:स्वार्थीपणे काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

तसेच रितेशने आपल्या वडिलांसोबत केलेल्या पहिल्या एसटी प्रवासाच्या आठवणीही त्यांनी यावेळी शेअर केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, रितेशचे वडील विलासराव देशमुख हेही परिवहन मंत्री राहिले होते.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group