काशीला जाण्याचा प्लॅन आहे? मग ही बातमी वाचाच! पुण्यातून नवी ट्रेन सुरू
काशीला जाण्याचा प्लॅन आहे? मग ही बातमी वाचाच! पुण्यातून नवी ट्रेन सुरू
img
नितीशा कुलकर्णी





काशीला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हडपसर ते बनारस दरम्यान नियमित रेल्वे सेवा जाहीर केली आहे.

२ मे पासून आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली असून प्रवाशांना आता थेट घरबसल्या काशी यात्रेचे नियोजन करता येणार आहे. उन्हाळी सुट्टीत काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. आता पुण्यातून थेट बनारस दर्शन सोपं होणार आहे. रेल्वेने हडपसर-बनारस-हडपसर ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस सेवा सुरू केली आहे. सोमवार, 4 मे रोजी पासून रोज सकाळी ही ट्रेन हडपसरहून सुटणार आहे. त्यामुळे पर्यटन आणि इतर कारणांनी उत्तर भारतात जाणाऱ्यांच्या प्रवासाचं टेन्शन मिटणार आहे.

विशेष ट्रेनचं वेळापत्रक

हडपसर-बनारस-हडपसर अमृत भारत एक्स्प्रेस 4 मेपासून धावणार आहे. रोज सकाळी 7.50 मिनिटांनी ही गाडी हडपसरहून सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता ती बनारसला पोहोचेल. तर बनारस येथून शनिवारी, 2 मे रोजीपासून रोज सायंकाळी सव्वासहा वाजता ही गाडी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी ती हडपसरला पोहोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

थांबे कुठे कुठे पहा

अमृत भारत एक्सप्रेसला दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, हरदा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, गोविंदपुरी, फत्तेपूर, प्रयागराज जंक्शन आणि ज्ञानपूर रोड असे थांबे आहेत.

आरक्षण प्रक्रिया या गाडीसाठी

2 मेपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण करता येईल. तर, विनाआरक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणाली आणि रेलवन या अॅपवर आरक्षण करता येईल, सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर किंवा एनटीईएस अॅपवर संपर्क करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group