कोणाचे ३ लाख तर कोणाचे ५ लाख बुडवले; शशांक केतकरने केले 'या' निर्मात्यावर गंभीर आरोप
कोणाचे ३ लाख तर कोणाचे ५ लाख बुडवले; शशांक केतकरने केले 'या' निर्मात्यावर गंभीर आरोप
img
वैष्णवी सांगळे
'होणार सून मी ह्या घरची', 'हे मन बावरे' ,'पाहिले न मी तुला' , 'मुरांबा' यांसारख्या मालिकांमधून शशांक केतकर घराघरांत पोहोचला. शशांक केतकरनं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करुन एका मालिकेच्या निर्मात्याकडून मानधन थकवण्याचा आरोप केला होता. पण, पोस्टमध्ये शशांकनं कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. आता शशांकनं त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करुन निर्मात्याचं नाव घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच, निर्मात्यासोबत झालेल्या संभाषणाचे काही स्क्रिनशॉर्ट्सही शेअर केले आहेत.   

अभिनेता शशांक केतकरने मन हे बावरे मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर पैसे थकवल्याचे गंभीर आरोप केले. मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत शशांकने व्हिडीओतून अनेक वर्ष पैसे मागितल्यानेही न दिल्याचा आरोप मंदार देवस्थळींवर केला आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही त्याने म्हटलं आहे. शशांकच्या या पोस्टवर इतरही काही मराठी कलाकारांनी मंदार देवस्थळींनी पैसे बुडवल्याचं म्हटलं आहे. 

शशांकने पोस्टमध्ये म्हटलं आहे,  मी legal action घेतोच आहे  पण तूर्तास मंदार देवस्थळी ( मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा pattern तुमच्याही लक्षात यावा या साठी हा video screenshots सकट पोस्ट करतो आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गया वया करतो, darling, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो. 

५,००,००० ही एखाद्या साठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. हे मन बावरे या मालीकेचे per day प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले ( मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्यानी payment देताना TDS कापला आणि goverment ला भरला नाही असा दुहेरी गुन्हा केला आहे. 

बर ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही…. सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहे, पण आत्ता मी फक्त माझ्या साठी बोलतो आहे. 

YouTube वर ४ वर्षपूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला त्यातही त्याचा हा थापा मारायचा pattern clear दिसतो. आणि आमच्या पैसाच केलं काय या बद्दल चकार शब्द काढत नाही तो ! 

असो, या पुढचा video बाकी सगळ्या legal details सकट असेल ???????? लवकरच… 

याच्यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामाला मी किंवा team मधला कोणीही जबाबदार नसेल. 

इथे हे आवर्जून सांगाव लागेल सगळेच निर्माते असे fraud अजिबात नसतात. त्यामुळे हे फक्त आणि फक्त @mandarr_devsthali याच्या बद्दल आहे. Industry मध्ये अनेक उत्तम निर्माते आहेत त्यांना नक्की कळेल मी काय म्हणतोय ते. आम्ही उत्तम काम करून तुमच prject चालवतो, तुम्ही वेळेत पैसे देऊन तुमच काम उत्तम करा! 

अभिनेत्री विदिशा म्हसकरने शशांकच्या पोस्टवर कमेंट करत ३ लाख थकवल्याचं म्हटलं आहे. विदिशा मन हे बावरे मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत होती. "माझेही TDS सहित जवळपास ३ लाख रुपये आहेत. त्यावेळी आम्ही बोललो म्हणून आम्हाला ट्रोल केलं गेलं. चुकीचं ठरवलं गेलं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये हे असंच चालतं, असं आम्हाला ऐकवलं गेलं. नंतर ही गोष्टच आपण सोडून दिली. या अनुभवातून चांगला धडा घेऊन मी ठरवलं की हेच प्रयत्न मी माझ्या पुढच्या कामात लावेन. जॉब, व्यवसाय बाकी सगळ्या गोष्टींसाठी कायदे आहेत. पण, आमच्या इंडस्ट्रीसाठी एकही कायदा नाही, हे वाईट आहे", असं विदिशाने म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group