मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक तारा हरपला; जेष्ठ अभिनेते मिलींद सफई यांचे निधन
मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक तारा हरपला; जेष्ठ अभिनेते मिलींद सफई यांचे निधन
img
DB

मुंबई : जेष्ठ मिलिंद सफाई या प्रसिद्ध अभिनेत्याचं नुकतंच निधन झालं आहे. अभिनेते मिलिंद सफई यांचे आज सकाळी १०:४५ मिनिटांनी निधन झाले आहे. अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होत. आई कुठे काय करते या मालिकेत त्यांनी अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

 मिलिंद सफाई यांनी बहुतांशी मराठीत काम केले आहे. मिलिंद सफई यांच्या निधनाचं वृत्त कळताच सिनेसृष्टीत एक आधारस्तंभ हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 

मराठीसोबतच मिलींद यांनी हिंदी कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं.  अनेक मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचं कौशल्य सिद्ध केलं आहे. सिनेसृष्टीतून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचं निधन कशामुळे झालंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group