मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहेत. त्यांच्या जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मराठी सोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. सुहासिनी देशपांडे यांच्या गाजलेल्या चित्रपटात देवकीनंदन गोपाला, वारसा लक्ष्मीचा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, पुढचं पाऊल, आज झाले मुक्त मी (१९८६), धग, माहेरचा आहेर, गड जेजुरी, आम्ही दोघे राजा राणी, बाईसाहेब, मानाचं कुंकू (१९८१), तसेच रंगभूमीशी सतत संलग्न राहून तुझं आहे तुझ्या पाशी, कथा अकलेच्या कांद्याची, बेल भंडार, सुनबाई घर तुझंच आहे, राजकारण गेलं चुलीत, चिरंजीव आईस, सासूबाईंचं असंच असतं, लग्नाची बेडी अशा नाटकांचे हजारो प्रयोग त्यांनी केले आहेत. सुहासिनी देशपांडे यांना २०१५ साली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.