प्रतिक्षा संपली ! 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
प्रतिक्षा संपली ! 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
img
वैष्णवी सांगळे
मराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय ठरलेल्या आणि प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या मनात आजही ताजा आहे. कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से, या सगळ्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना  आजही हसवतो. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वलची वाट चाहते पाहत होते आणि आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘ पुन्हा एकदा साडे माडे तीन ’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

नुकत्याच झळकलेल्या नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव , मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स त्यांच्या नेहमीच्या अवखळ अंदाजात दिसत आहेत. त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरूचाही ताजातवाना अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आता प्रचंड शिगेला पोहोचली आहे.

दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाले, ‘’ या वेळची जबाबदारी जास्त मोठी होती. पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र कलाकार, निर्माते, पटकथा आणि संवाद लेखक संदीप दंडवते आणि तंत्रज्ञ यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आम्ही त्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो आहोत. हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे . 
इतर बातम्या
Join Whatsapp Group