मोठी बातमी : महाराष्ट्राची दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास
मोठी बातमी : महाराष्ट्राची दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास
img
Dipali Ghadwaje
क्रीडा विश्वातून आत्ताची सर्वात मोठी आणि भारतासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास घडवला आहे. दिव्या देशमुख वूमन्स चेस वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली आहे.

दिव्याने फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हंपी हीचा पराभव करत हा कारनामा केला आहे. दिव्या यासह वूमन्स चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. दिव्याआधी कोणत्याही भारतीय महिलेला अशी कामगिरी करता आली नव्हती. दिव्याच्या या विजयानंतर तिचं सोशल मीडियावर सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.

वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये दोन्ही कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या दोन्ही भारताच्या लेकी होत्या. त्यामुळे भारतातच हा वर्ल्ड कप येणार हे निश्चित होतं. मात्र दोघीपैकी या वर्ल्ड कपवर कोण नाव कोरणार? याची उत्सूकता होती.

मात्र दिव्याने चाली करत कोनेरुला पराभवाची धुळ चारली. विजय मिळवताच दिव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला कोनेरु हंपीला अंतिम फेरीत येऊन पराभूत व्हावं लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय.

 

इतर बातम्या
मोठी बातमी :

Join Whatsapp Group