प्रार्थना बेहरेच्या आयुष्यात गोंडस पाहुण्याचे आगमन , शेअर करत फोटो म्हणाली....
प्रार्थना बेहरेच्या आयुष्यात गोंडस पाहुण्याचे आगमन , शेअर करत फोटो म्हणाली....
img
Dipali Ghadwaje
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणजे, लाखो चाहत्यांच्या दिलाची धडकन. मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींमध्ये प्रार्थनाचा समावेश आवर्जुन केला जातो. आपल्या क्लासी फोटोंमुळे आणि लूकमुळे चर्चेत असणारी प्रार्थना आज वेगळ्या कारणानं चर्चेत आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आपल्या इवलुशा पावलांनी प्रार्थनाच्या घरात आलेल्या या पाहुण्यानं आनंदाचं वातावरण आहे. प्रार्थनानं आपल्या आयुष्यातील ही सर्वात मोठी गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यासोबतच तिनं तिच्या नवऱ्याला एक वचनही दिलं आहे.

प्रार्थना बेहेरेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलंय की, "माझं आणखी एक बाळ- 'रील'ला भेटा. आपली गरज कोणाला आहे हे कुत्र्यांना बरोबर कळतं. आपल्या नकळत आपल्या आयुष्यातली पोकळी ते भरुन काढतात. अभिषेक, रीलला चांगलं नवीन घर दिल्याबद्दल आणि बेस्ट आयुष्य दिल्याबद्दल आभार. मी तुला कधीच निराश करणार नाही असं वचन देते." 

प्रार्थनाच्या घरी आलेला चिमुकला पाहुणा नेमका कोण? 

प्रार्थनाच्या घरी आलेला चिमुकला नवा पाहुणा म्हणजे, कुत्र्याचं पिल्लू आहे. तिनं त्याचं नाव रील असं ठेवलंय. प्रार्थनाचं प्राणी प्रेम काही कुणापासून लपलेलं नाही. प्रार्थनाला प्राण्यांची खूप आवड आहे. लग्नाआधीही तिनं एक कुत्रा पाळला होता, त्याचं नाव तिनं गब्बर ठेवलेलं. त्यानंतर प्रार्थनाचं लग्न झाल्यावर तिच्याकडे आणखी इतरही प्राण्यांची भर पडली. तिच्या नवऱ्याकडे आणखी 7 कुत्रे, गायी आणि 10-12 घोडेही आहेत. अनेक मुलाखतींमध्ये बोलताना प्रार्थना गमतीनं म्हणालीय की, मी 15-16 मुलांची आई आहे. 

प्रार्थनानं इन्स्टावर केलेल्या पोस्टमध्ये तिनं काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये 'रील'सुद्धा आहे. तर एका फोटोमध्ये तिनं रिलला हातात धरलं आहे. खरं तर प्रार्थना आणि तिच्या नवऱ्यानं 'रिल'ला दत्तक घेतलं आहे. अक्षय्य तृतीयेला प्रार्थनाच्या घरी या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group