‘मराठी फिल्मफेअर पुरस्कार’ २०२५ चे विजेते : सोहळ्यात 'या' चित्रपटाने मारली बाजी ; पटकावले ७ पुरस्कार
‘मराठी फिल्मफेअर पुरस्कार’ २०२५ चे विजेते : सोहळ्यात 'या' चित्रपटाने मारली बाजी ; पटकावले ७ पुरस्कार
img
Dipali Ghadwaje
मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये दहावा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात उषा मंगेशकर यांना मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय आणि महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

या दिमाखदार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी या कार्यक्रमचं सूत्रसंचालन केलं.

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना या नामांकनांमध्ये स्थान मिळालं होतं. अभिनेत्री प्राजक्ती माळीचा ‘फुलवंती’ हा सात प्रमुख पुरस्कारांसह या सोहळ्यातील सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला.

त्यापाठोपाठ ‘पाणी’ या चित्रपटाने सहा पुरस्कार पटकावले.  महेश मांजरेकर यांना ‘जुनं फर्निचर’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल, तर प्राजक्ता माळी (फुलवंती) आणि वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

आदिनाथ कोठारेला ‘पाणी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर जितेंद्र जोशीला ‘घात’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स चॉइस) पुरस्कार मिळाला. राजश्री देशपांडेला ‘सत्यशोधक’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स चॉइस) म्हणून निवडण्यात आलं.

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी : 

सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदिनाथ एम. कोठारे – पाणी
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)- अमलताश (सुहास देसले), घात (छत्रपाल आनंद निनावे)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका – पुरुष)- महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)- जितेंद्र जोशी (घात)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका – स्त्री)- प्राजक्ता माळी (फुलवंती), वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)- राजश्री देशपांडे (सत्यशोधक)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष)- क्षितिश दाते (धर्मवीर 2)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (स्त्री)- नम्रता संभेराव (नाच गं घुमा)
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम- अविनाश-विश्वजीत (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट गीत- कै. शांता शेळके (सरले सारे – अमलताश)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष)- राहुल देशपांडे (सरले सारे – अमलताश)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (स्त्री)- वैशाली माडे (मदनमंजिरी – फुलवंती)
सर्वोत्कृष्ट कथा- छत्रपाल आनंद निनावे (घात)
सर्वोत्कृष्ट पटकथा- नितीन दीक्षित (पाणी)
सर्वोत्कृष्ट संवाद- महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- गुलराज सिंग (पाणी)
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन- अनमोल भावे (पाणी)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण- महेश लिमये (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- एकनाथ कदम (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- मयूर हरदास आणि आदिनाथ एम. कोठारे (पाणी), नवनीता सेन (घात)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- मानसी अत्तार्डे (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक- नवज्योत बांदिवडेकर (घरत गणपती), राहुल रामचंद्र पवार (खडमोड)
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरूष- धैर्य घोलप (एक नंबर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्त्री- जुई भागवत (लाइक आणि सब्सक्राइब)
जीवनगौरव पुरस्कार- उषा मंगेशकर
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group