एका दिवसाची फी ५ कोटी! जेठालाल नव्हे तर
एका दिवसाची फी ५ कोटी! जेठालाल नव्हे तर "हा" आहे टीव्हीवरील सर्वात महागडा कॉमेडी अभिनेता
img
Dipali Ghadwaje
मुंबई : भारतीय टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता दर एपिसोडसाठी तब्बल ५ कोटी रुपये घेतोय. आताच्या घडीला या अभिनेत्याची एकूण संपत्ती ३०० कोटींच्याही वर गेली आहे. विशेष म्हणजे हा अभिनेता कोणतीही सासू सुनेची मालिका करत नाही. प्रेक्षकांचा अधिक कल सासू सुनेच्या ड्रामा सिरियलला जास्त असतो. पण तरीही यावेळी जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्याचे नाव या मालिकांशी संबंधीत नाही.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कपिल शर्मा आहे. सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेत्याची कमाई, संपत्ती आणि ऐशोआरामी जीवन कसे आहे ते जाणून घेऊ.  

या यादीत रुपाली गांगुलीला देखील नंबर लागतो,ती प्रति एपिसोड ३ लाख रुपये कमवते. 'नागिन ६' मधल्या तेजस्वी प्रकाश सारखे प्रसिद्ध चेहरे देखील या यादीत आहेत. पण भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात श्रीमंत म्हणून कॉमेडीयन कपिल शर्माचे नाव समोर आले आहे.
  
कपिल शर्माची एकूण संपत्ती

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सूत्रसंचालक कपिल शर्मा प्रति एपिसोड ५ कोटी रुपये कमावतो. त्यांची एकूण संपत्ती ३०० कोटी रुपये आहे. २००७ मध्ये सुरू झालेल्या 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सीझन ३' मधून कपिल शर्माला प्रसिद्धी मिळाली. पुढे २०१३ मध्ये कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि नंतर २०१६ ते २०२३ पर्यंत द कपिल शर्मा शो या शोमध्ये सूत्रसंचालन करताना तो दिसला, तेव्हापासूनच तो टीव्ही इंडस्ट्रीवर वर्चस्व गाजवत आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group