घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान असं का बोलला अभिषेक बच्चन? म्हणाला, “आयुष्यात प्रत्येकासाठी एक....
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान असं का बोलला अभिषेक बच्चन? म्हणाला, “आयुष्यात प्रत्येकासाठी एक...."
img
Dipali Ghadwaje
बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे संबंध आता टोकाला गेल्याचे म्हटलं जातंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. दोघांचाही घटस्फोट झाला असून ते आता वेगवेगळे राहत असल्याचंही बोललं जातंय. त्यातच अभिषेकचे नाव हे एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबतही जोडले जात आहे. अभिषेकचे अभिनेत्री निम्रत कौरसोबत अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा सध्या रंगत आहेत.

यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे नाते आता खरंच संपुष्टात आले असल्याचं समजलं जातंय.  पाहायला गेलं तर अद्याप बच्चन कुटुंब किंवा स्वतः अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी घटस्फोटाबाबत अधिकृत असं काहीच सांगितलेलं नाही. मात्र, दोघेही सतत वेगवेगळे दिसून आल्याने त्यांच्यात काहीतरी नक्कीच बिनसलं आहे, असं म्हटलं जातंय.  

अशातच अभिषेक बच्चनने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलंय. अभिषेक सध्या त्याच्या आगामी ‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटाचं प्रमोशन करतोय. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिषेक त्याच्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. 

शूजितच्या या चित्रपटात काम करताना तुला काय शिकायला मिळाले, असा सवाल अभिषेकला मुलाखतीत करण्यात आला होता. त्यावर अभिषेक म्हणाला की, पुन्हा कधीच चित्रपटासाठी वजन वाढवू नका. खरंच, या वयात पुन्हा वजन कमी करणं खूप कठीण होतं. तसंच पुढे तो म्हणाला की, आयुष्यात प्रत्येकासाठी एक छोटीशी जागा असते, हे या चित्रपटातून समजते. यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही साधर्म्य आढळेल अशी माझी अपेक्षा आहे. आपण सगळे जण आयुष्याच्या एका चाकोरीत अडकलोय आणि जे आपण करत आलोय तेच सतत करतोय. तुम्ही काय आणि कसं करावं हे तुमचं आयुष्य ठरवतंय, असं अभिषेक म्हणाला.
 
अभिषेकने केलेलं हे विधान आता चर्चेत आलंय. कोणत्याही गोष्टीमध्ये यश किंवा अपयश हे महत्वाचे नसते. तर, तुम्ही जे काम करताय ते काम मनापासून करणं आणि त्यातून चांगल्या आठवणी निर्माण करणं हे महत्वाचे असून ते तुमच्याच हातात आहे, असंही अभिषेक म्हणाला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group