बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही विशेष ओळखली जाते. ऐश्वर्याने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिचा नवरा म्हणजेच अभिषेक बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. या दोघांच्या नात्याबद्दल विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नांचा निषेध केला होता. पण या प्रकरणी हे दाम्पत्य अजूनही मौन बाळगून आहे. दरम्यान, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय झालं?
ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच दुबईत 'ग्लोबल वुमन्स फोरम २०२४' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कार्यक्रमातील ऐश्वर्याच्या लूकने सर्वांना घायाळ केले होते. तसेच या कार्यक्रमात जेव्हा ती स्टेजवर पोहोचली तेव्हा तिच्या मागे स्क्रीनवर तिचं नाव आलं, जे पाहून चाहते थक्क झाले. तिच्या नावापुढे म्हणजेच ऐश्वर्या रायच्या पुढे 'बच्चन' आडनाव मिस होतं. तेवढ्यात नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नात्यातील दुरावा यावर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी वेगवेगळे अनुमान लावण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर दुबईमधील या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट केल्या आहेत.