बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातात मोठी अपडेट समोर आली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वांद्रे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराला पोलिस वांद्रे पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहेत. तब्बल ३३ तासांनंतर आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
सैफ अली खानवर गुरूवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हल्ला करण्यात आला होता. चोरीच्या उद्देशाने घरामध्ये शिरलेल्या हल्लेखोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान आणि त्याच्या घरामध्ये काम करणाऱ्या दोन मोलकरणी जखमी झाल्या. सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता सध्या डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत आहे.
सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणाऱ्या दोन मोलकरणीवर देखील चोराने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर ३३ तासांनंतर एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा आरोपी सैफवर हल्ला करणारा आहे का याचा पोलिस तपास करत आहेत.