धक्कादायक ! तरुणावरून दोघींमध्ये वाद; मैत्रिणीला घरी बोलावलं आणि...
धक्कादायक ! तरुणावरून दोघींमध्ये वाद; मैत्रिणीला घरी बोलावलं आणि...
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील होम गार्डच्या हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. होमगार्ड तरुणीच्या हत्या प्रकरणात तिच्याच मैत्रिणीचा समावेश असून प्रेमाच्या त्रिकोणातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. 

मृत विवाहित तरुणीचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे (वय 26) आहे. चार वर्षांपूर्वी तिचे पती अपघातात वारले. त्यामुळे अयोध्या ही तिच्या तीन वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. अयोध्या नुकतीच होमगार्डमध्ये भरती झाली होती. अयोध्याची मैत्रीण फडताडे हिचे एका राठोड नावाच्या मुलावर प्रेम होते. पण काही दिवसांपासून राठोड आणि अयोध्याची जवळीक वाढली. त्यामुळे फडताडेला राग आला आणि याच रागातून तिने अयोध्याला मारण्याचा प्लॅन बनवला.

हे ही वाचा...  
धक्कादायक ! संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी चूक

दोन दिवसांपूर्वी फडताडे हिने अयोध्याला घरी बोलावले. तिथे मुलाच्या मदतीने तिने अयोध्याचा गळा दाबून खून केला. नंतर हा मृतदेह बीड शहराजवळील नाल्यात फेकून देण्यात आला होता. गुरुवारी सकाळी काही लोकांना तो मृतदेह दिसला. स्थानिकांनी लगेच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करत आरोपी फडताडे, तिचा मुलगा आणि इतर दोन जणांना अटक केली आहे.

दरम्यान, या खुनाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या गुन्ह्यात आणखी कोण सामील आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group