धक्कादायक ! संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी चूक
धक्कादायक ! संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी चूक
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : दिल्लीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. याठिकाणी संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. एका व्यक्तीने भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. ही घटना सकाळी ६:३० वाजता घडली. त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. आरोपी संसदेच्या गरुड गेटवर पोहोचला होता, तिथून सुरक्षा दलांनी त्याला पकडले आणि आता पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

हे ही वाचा... 
देवा का रे इतकी परीक्षा ? बैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

रेल भवनच्या बाजूने भिंतीवरून उडी मारून एका व्यक्तीने संसद भवनात प्रवेश केला. तो गरुड द्वार येथे पोहोचला, परंतु त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. संसदेच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे प्रकरण उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.  

हे ही वाचा... 
नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

मागील वर्षी  १६ ऑगस्टला संसद भवनाच्या सुरक्षेचा भंग झाल्याची घटना घडली होती. दुपारी एका तरुणाने भिंतीवरून उडी मारून संसदेच्या संकुलात प्रवेश केला होता तर 13 डिसेंबर 2023 रोजी नवीन संसद भवनाच्या व्हिजिटर गॅलरीत बसलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या चपलासह इमारतीत पिवळे स्प्रे पसरवले होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group