नव्या संसद भवनाचा आज श्रीगणेशा! आजपासून सुरू होणार कामकाज
नव्या संसद भवनाचा आज श्रीगणेशा! आजपासून सुरू होणार कामकाज
img
Dipali Ghadwaje
देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच याच शुभमुहूर्तावर आजपासून नव्या संसदेचा श्रीगणेशा होणार आहे. नव्या संसदेत आज दुपारी १ वाजल्यापासून कामकाजाला सुरूवात होईल.

आजपासून संसदेच्या नवीन इमारतीचा श्रीगणेशा होणार आहे. लोकसभेचे कामकाज दुपारी 1:15 वाजता सुरू होईल, तर राज्यसभेचे कामकाज 2:15 वाजता सुरू होईल. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये एकूण 1280 सभासदांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी मे महिन्यात या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले होते. या इमारतीमध्ये लोकसभेच्या चेंबरमध्ये 888 सदस्य आणि राज्यसभेच्या चेंबरमध्ये 300 सदस्य आरामात बसू शकतात. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाल्यास लोकसभेच्या सभागृहात एकूण १२८० सदस्य बसू शकतात.

केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नवीन संसद भवन तयार करण्यात आले आहे. 64,500 चौरस मीटरमध्ये पसरलेली ही चार मजली इमारत त्रिकोणी आकाराची आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जुन्या संसद भवनापेक्षा नवी संसद भवन सुमारे १७,००० चौरस मीटर मोठे आहे. यासाठी 971 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group