महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी ? पंतप्रधानांचा सल्ला, नेमकं काय म्हणाले ?
महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी ? पंतप्रधानांचा सल्ला, नेमकं काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी मुबंईत महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली यावेळी त्यांनी तसेच गावागावात महायुतीने डब्बा पार्टीचे आयोजन करावे, असा सल्ला दिला.  त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सल्लामुळे आता महायुतीकडून गावागावात डब्बा पार्टी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थतीत होते.  त्यानंतर दुसऱ्यांना नरेंद्र मोदी मुंबईत आले. यावेळी त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आमदारांना अनेक टिप्स दिल्या. तसेच गावागावात महायुतीने डब्बा पार्टीचे आयोजन करावे, असा सल्ला दिला. मोदी यांच्या सल्लामुळे आता महायुतीकडून गावागावात डब्बा पार्टी होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना महायुती म्हणून संघटन वाढवण्यावर भर द्या, असे आवाहन केले. महायुतीमधील एकोपा वाढण्यासाठी मोदी म्हणाले, मतदारसंघात घटक पक्षातील आपले जे आमदार आहेत पदाधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयांना एकमेकांनी भेटी द्या. तसेच महायुती अधिक घट्ट करण्यासाठीर गावो गावी डब्बा पार्टी आयोजन करा.
इतर बातम्या
Join Whatsapp Group