ट्रम्पचे ‘टॅरिफ टेरर’! भारताला 50 टक्क्यांचा शॉक... PM मोदींचं मोठं विधान म्हणाले भारत कधीही...
ट्रम्पचे ‘टॅरिफ टेरर’! भारताला 50 टक्क्यांचा शॉक... PM मोदींचं मोठं विधान म्हणाले भारत कधीही...
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या वॉर्निंगप्रमाणात भारतावर एकूण 50% कर लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी भारतावर 25 +25 टक्के टॅरिफ लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आणि म्हणाले की रशियाकडून तेलाची सतत खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त 25% कर लादण्यात आला आहे. 

यावर आता पंतप्रधान मोदी यांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. मला वैयक्तिकरित्या माहित आहे की, मला यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. परंतु यासाठी मी तयार आहे. भारत आपल्या शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास तयार आहे'. 

हे ही वाचा
PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राज्यात मोठ्या अभियानाला होणार सुरुवात, नवीन अभियान काय जाणून घ्या

रशियाकडून भारताच्या तेल आयातीला प्रतिसाद म्हणून अमेरिकेनं अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफ टॅक्सच्या निर्णयावर पंतप्रधान मोदींनी हे विधान केलं आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

'इतर देशही त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी रशियन तेलाची आयात करत आहेत, अशा परिस्थितीत भारतावरच दंडात्मक कारवाई का? हे भेदभावपूर्ण आहे,' असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच 'भारतीय राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील,' असा पुनरुच्चारही परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group