ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केलंय, परंतु.. ; पंतप्रधानांचा इशारा
ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केलंय, परंतु.. ; पंतप्रधानांचा इशारा
img
दैनिक भ्रमर
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच देशाला उद्देशून भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल एक मोठे विधान केले आहे.

मागील काही दिवसांत देशाचे सामर्थ्य आणि संयम या दोन्हींचा मिलाफ जगाने पाहिला. देशाच्या लष्कराचे आणि गुप्तचर यंत्रणेचे विशेष आभार मानतो. ऑपरेशन सिंदूर मोहीम त्यांनी फत्ते केली. देशाच्या प्रत्येक लेक मातेला ही मोहीम समर्पित होती. २२ तारखेला पहलगाममध्ये पर्यटकांना धर्म विचारून, कुटुंबासमोर त्यांना मारलं होतं. दहशतवादाचा हा भयंकर विद्रूप चेहरा होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या हा मोठा धक्का होता. आम्ही सैनिकांना खुली सूट दिली होती. ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. आत्ता केवळ ही मोहीम स्थगित केली आहे, असा इशारा देतानाच येणाऱ्या दिवसांत आम्ही त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवू, आगळीक झाली तर रोखठोक उत्तर देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले.

भारताने राबवविलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी कशी झाली, हे देखील मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.दरम्यान "पाकिस्तानकडून विनंती होत असताना भारताने विचार केला. सिंदूर ऑपरेशन केवळ स्थगित केले आहे, येणाऱ्या दिवसांत आम्ही त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवू. पण जर त्यांनी आगळीक केली तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ"
इतर बातम्या
Join Whatsapp Group