अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 25% अतिरिक्त कर लादण्याची नोटीस बजावली असून आता नवीन टॅरिफ 27 ऑगस्टपासून येत्या काही तासांत लागू होईल असे सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या या टॅरिफचे मंगळवारी देशांतर्गत बाजारात पडसाद उमटले असून देशांतर्गत मार्केटमध्ये गोंधळ उडाला आहे. ट्रम्प प्रशासनाने म्हटले की रशियाकडून तेल खरेदी करून भारत अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धासाठी मॉस्कोला निधी देत आहे. हा अतिरिक्त 25% कर 1 ऑगस्टपासून लादलेल्या 25% परस्पर कराच्या अतिरिक्त असेल, ज्यामुळे भारतातून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवरील एकूण कर 50% होईल.
हे ही वाचा
आज सकाळी शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीवर मोठा परिणाम दिसून आला. यासोबत अनेक मोठ्या कंपनींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
निफ्टी निर्देशांकावरही टॅरिफचा असाच काहीसा परिणाम दिसून आला. शेअर मार्केट उघडताच निफ्टी २४,८९९.५० वर उघडल्यानंतर एनएसई निर्देशांक त्याच्या मागील बंद २४,९६७.७५ वरून घसरला आणि अचानक २०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला आणि २४,७६३ वर ट्रेड करताना दिसला. टॅरिफच्या परिणामांमुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स अचानक घसरले.
हे ही वाचा
शेअर बाजाराच्या खराब सुरुवातीदरम्यान सुमारे १०३६ कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात वाढीसह उघडले. तर १२०७ कंपन्यांचे शेअर्स मागील बंदच्या तुलनेत घसरणीसह लाल रंगात उघडले. याशिवाय १५१ कंपन्यांचे शेअर्स फ्लॅट ओपनिंगमध्ये होते. म्हणजेच त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा बदल दिसून आला नाही. शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या धडामधूडला टॅरिफ कारणीभूत आहे. टॅरीफच्या भीतीने शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ६३० पेक्षा जास्त अंकांनी घसरून ८१,००० च्या खाली आला आणि ८०,९४७ वर ट्रेड करताना दिसला.