देशांतर्गत शेअर बाजाराने केला नवा विक्रम ; सेन्सेक्सचा प्रथमच 84 हजारांचा टप्पा पार
देशांतर्गत शेअर बाजाराने केला नवा विक्रम ; सेन्सेक्सचा प्रथमच 84 हजारांचा टप्पा पार
img
Dipali Ghadwaje
शेअर मार्केटमधून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आजही शेअर मार्केटमध्ये तेजी कायम असून, आज नवीन विक्रम झाला आहे. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी नवा सार्वकालिक उच्चांक नोंदवला आहे. इतिहासात प्रथमच बीएसई सेन्सेक्सने 84 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. 

देशांतर्गत शेअर बाजाराने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. अल्पावधीतच बाजारात जबरदस्त तेजीची नोंद झाली आहे. BSE सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच 84 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

सेन्सेक्सने प्रथमच 84,100 चा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. याआधी गुरुवारीही सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला होता. सेन्सेक्सशिवाय निफ्टीनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. निफ्टी नवीन शिखरावर आहे आणि प्रथमच 25,650 च्या पुढे गेला आहे.

बाजार अचानक वधारला

सकाळी 9:15 वाजता सेन्सेक्स 350 अंकांनी तर निफ्टी जवळपास 100 अंकांनी वर होता. काही मिनिटांनंतर, सकाळी 9:20 वाजता, सेन्सेक्स 175 अंकांवर आला होता आणि 83,370 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. त्यानंतर व्यापारादरम्यान, बाजाराने चांगले पुनरागमन केले आणि 900 अंकांनी उडी मारून नवीन विक्रमी उच्चांक केला. सकाळी 11 वाजता सेन्सेक्सने 900 हून अधिक अंकांच्या नेत्रदीपक वाढीसह 84159 चा टप्पा ओलांडला. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 84 हजारांवर पोहोचला आहे. तसेच निफ्टी 25,663.45 अंकांची उच्च पातळी गाठल्यानंतर 11 वाजता सुमारे 225 अंकांच्या वाढीसह 25,645 अंकांवर व्यवहार करत होता.

गुंतवणूकदारांनी कमावले 4 लाख कोटी 

बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांनाही मोठा नफा झाला आहे. काल BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 4,65,47,277 कोटी रुपये होते, ते आज 4 लाख कोटी रुपयांनी वाढून 4,69,33,988 कोटी रुपये झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group