शेअर बाजारात खळबळ : सेन्सेक्स-निफ्टी कोसळल्याने 'या' १० स्टॉक्सचे सर्वाधिक नुकसान
शेअर बाजारात खळबळ : सेन्सेक्स-निफ्टी कोसळल्याने 'या' १० स्टॉक्सचे सर्वाधिक नुकसान
img
Dipali Ghadwaje
आठवड्याच्या पहिल्याच दिवश शेअर बाजारात खळबळ उडाली. बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार दबावाखाली आहेत. २६ सप्टेंबर २०२४ पासून सेन्सेक्स ९४८६ हून अधिक घसरला आहे. या काळात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आज (सोमवारी) सेन्सेक्स जवळपास ८०० अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टीही २२५ अंकांच्या घसरणीसह उघडला.  यात बँक निफ्टी तरी का मागे राहील? त्यानेही ४६० अंक खाली जात दणका दिला. मिडकॅप इंडेक्स ८०० अंकांनी घसरला होता.

दरम्यान , रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर पोहचला आहे. १५ लाख कोटी रुपयांचे नुकसान आजच्या कमजोरीनंतर, BSE वर लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात १५ लाख कोटी रुपयांची घट झाली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांवर जवळपास ९०% दबाव दिसून आला.

काही महिन्यांतील सर्वात मोठी घसरण आजच्या घसरणीमुळे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेली सर्व गती बाजाराने गमावली आहे. प्रमुख निर्देशांक आणि व्यापक बाजारांसह आज बाजारात चौफेर विक्री दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ४% पर्यंत घसरले.

निफ्टी आणि सेन्सेक्स १.४% घसरत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकात आज ८ महिन्यांनंतर एक दिवसाची सर्वात मोठी घसरण झाली. त्याच वेळी, स्मॉल कॅपमध्ये आज एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ५ महिन्यांनंतर दिसून आली.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group