५४ रुपयांचा शेअर २५२ वर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ३६७% नफा
५४ रुपयांचा शेअर २५२ वर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ३६७% नफा
img
Dipali Ghadwaje
केसी एनर्जीच्या शेअरनं शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. ५४ रुपयांचा शेअर २५२ वर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ३६७% नफा  झाला आहे. कंपनीचे शेअर्स 367 टक्के नफ्यासह 252 रुपयांना बाजारात लिस्ट झाले आहेत. आयपीओमध्ये, गुंतवणूकदारांना केसी एनर्जीचे शेअर्स 54 रुपयांना मिळाले. 

दरम्यान ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये केसी एनर्जीच्या शेअर्सचं वाटप करण्यात आलं आहे त्यांनी पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर 198 रुपयांचा मोठा नफा कमावला आहे. परंतु, लिस्टिंग झाल्यानंतर लगेचच, कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 239.45 रुपयांवर पोहोचले. पहिल्याच दिवशी ४ लाखांचा फायदा कंपनीच्या आयपीओनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. 

किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये एका लॉटसाठी बोली लावता येणार होती. एका लॉटमध्ये 2000 शेअर्स होते आणि किरकोळ गुंतवणूकदारांना 108000 रुपये गुंतवावे लागले. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये एक लॉट म्हणजेच 2000 शेअर्स मिळाले होते, आता या शेअर्सचे सध्याचे मूल्य 504000 रुपये झालं आहे. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 396000 रुपयांचा मोठा नफा झाला आहे. 

कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले आहेत. 1052 पट झालेला सबस्क्राईब केसी एनर्जीचा आयपीओ एकूण 1052.45 पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत कंपनीचा आयपीओ 1311.10 पट सबस्क्राइब झाला होता.

नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा  कोटा 1668.97 पट सबस्क्राइब झाला होता, तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा 127.71 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईज 51 ते 54 रुपये होती. कंपनीच्या या इश्यूची एकूण साईज 15.93 कोटी रुपये होती.  आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांची भागीदारी 96.12 टक्के होती.  
stock |
इतर बातम्या
Join Whatsapp Group