शेअर बाजारात आज सर्व विक्रम मोडले गेले असून सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उंची गाठली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. आज 599 अंकांच्या उसळीसह सेन्सेक्सने 76,010 चा उच्चांक गाठला आहे. तर निफ्टीनेही 23110 चा आकडा पार केला आहे. या वाढीमुळे बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये 1.51 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, इन्फोसिस, टीसीएस, ॲक्सिस बँक आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये वाढ झाली. त्यामुळे सेन्सेक्सची ऐतिहासिक झेप पाहायला मिळाली. आज बीएसईचे मार्केट कॅप 1.51 लाख कोटी रुपयांच्या वाढीसह 421.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
आज बीएसईमधील 215 कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांचा उच्चांक गाठण्यात यशस्वी ठरले आहेत. बीएसई 500 मध्ये आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल इंडिया, अदानी पोर्ट्स, अशोक लेलँड, बीईएल, भारत फोर्ज, एअरटेल, कोचीन शिपयार्ड यांच्या शेअर्सच्या किमती 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आली तेजी फिनोलेक्स केबल्स, एजिस लॉजिस्टिक्स, इंडियन ओव्हरसीज बँक, जेबीएम ऑटो, ग्लेनमार्क फार्मा, यूको बँक, जेबी केमिकल्स, एस्ट्राझेनेका फार्मा, आरसीएफ यांच्या शेअर्सला आज शेअर बाजारात मोठी मागणी होती.
एनएसई निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 26 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आणि 23 शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज निफ्टी मिडकॅप पहिल्यांदा 53,043.60 ची पातळी गाठली.