शेअर बाजारातून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. शेअर बाजाराने पुन्हा एकदा इतिहास रचला. मंगळवारी सेन्सेक्स 80 हजारांच्या जवळपास घुटमळला. त्यानंतर त्याला पुढे झेप घेता आली नाही. पण आज बाजार उघडताच सेन्सेक्सने मोठी उसळी घेतली.
बीएसई सेन्सेक्सने 481.44 अंकांच्या उसळीने लक्ष्य भेदले. सेन्सेक्स आज 79,922.89 अंकांवर उघडला होता. तो काही मिनिटांतच व्यापारी सत्रात पुन्हा एकदा 572 अंकांच्या उसळीने 80,000 टप्पा पार करुन पुढे गेला. बाजाराच्या या घौडदौडीमुळे गुंतवणकूदारांनी भांगडा केला.
सेन्सेक्सने पहिल्यांदाच 80 हजारांचा टप्पा पार केला आहे. काल देशांतर्गत बाजारात थोडीशी घसरण झाली होती. पण आज व्यवसाय मजबूत राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
निफ्टीने ओलांडला 24,291.75 अंकांचा टप्पा
शेअर बाजाराने आज एक नवीन विक्रम केला आहे. सेन्सेक्सने80,039.22 अंकांची विक्रमी पातळी गाठली आहे. तर निफ्टीने 24,291.75 अंकांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी 9.20 वाजता सेन्सेक्स 358.44 अंकांच्या (0.45 टक्के) वाढीसह 79,800 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर निफ्टी 107.80 अंकांच्या (0.45 टक्के) वाढीसह 24,232 अंकांच्या जवळ होता.