पावसामुळे फुलांचा सुगंध महागला...! गणेशोत्सव, गौरीपूजनाला महागाईची झळ...
पावसामुळे फुलांचा सुगंध महागला...! गणेशोत्सव, गौरीपूजनाला महागाईची झळ...
img
Dipali Ghadwaje
गणरायाचे शनिवारी उत्साहात आगमन झाले.  गणपती बाप्पापाठोपाठ आता महालक्ष्म्यांच्या आगमनासाठी घरोघरी उत्साहात तयारी सुरु आहे. राज्यात महालक्ष्म्यांच्या स्वागतासाठी  बाजारपेठांमध्ये रेलचेल वाढली आहे. अशातच फुलांची बाजारपेठ झेंडू फुलांसह गुलाब, निशीगंध, शेवंती अशा कितीतरी फुलांनी सजली आहे. गणेशोत्सव आणि महालक्ष्म्यांमुळे सध्या केवडा, लाल फुलांसह झेंडूही महागला आहे. 

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानं फुलबाजाराला फटका बसला असून उत्पादन खराब झाले आहे. फुलांची आवक घटली आहे. मात्र, मागणी प्रचंड असल्यानं यंदा फुलांसाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.  

यंदा राज्यात झालेल्या पावसाने अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी जाहीर झाली असून हजारो हेक्टर पिकाचे नुकसान झाले. गणेशोत्सवासह महालक्ष्म्याना फुलांना मोठी मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी झेंडूसह, जरबेरा, गुलाब अशा फुलांचे उत्पादन घेतले होते. अतिवृष्टीने सर्व फुलझाडे खराब झाली असून ऐन सणात फुले खराब झाल्याने शेतकरी हताश आहेत.

महाराष्ट्रात फुल उत्पादन ३३५६ हेक्टरात

भारतात सर्वाधिक फुलउत्पादन घेणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्रही एक आहे. महाराष्ट्रात साधारण ३३५६ हेक्टर क्षेत्रावर फुलांचं उत्पादन घेतलं जातं. कार्नेशन आणि जरबेरा यांसारख्या कापलेल्या फुलांच्या पिकांना देशात चांगली बाजारपेठ मिळत आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group