मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील 60 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
सोयाबीनमधील मॉइश्चर संदर्भातली अट शिथिल करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता सोयाबीन विक्रीसाठी 12% मॉईश्चरची अट 15% पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाने या संदर्भात माहिती दिली आहे.
मॉइश्चर संदर्भातली मर्यादा 12% वरून 15% पर्यंत वाढ
सोयाबीन महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात उगवला जातो. त्यामुळे सोयाबीन त्या सर्व जिल्ह्यात ऐरणीवरचा मुद्दा आहे, हे आम्ही नाकारणार नाही. मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीनचा मुद्दा समजून घ्यावा, अशी आमची भूमिका आहे. सोयाबीनच्या काढणीच्या काळात या वर्षी प्रचंड पाऊस पडला, त्यामुळे सोयाबीन मध्ये जास्त ओलावा (मॉईश्चर) होता. त्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्रावर जास्त ओलाव्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन नाकारण्यात आला. आम्ही केंद्र सरकारला विनंती करून खरेदी केंद्रावर मॉइश्चर संदर्भातली मर्यादा 12% वरून 15% पर्यंत वाढवून घेतली आहे. नाफेड ने कालच तसे जाहीर ही केले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांना त्यांचा सर्व सोयाबीन कोणत्याही अडचणीविना खरेदी केंद्रावर 4 हजार 892 रू प्रति क्विंटल दराने विकता येईल, असं दावा पाशा पटेल यांनी केला आहे.