मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.
जर शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी जे अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले त्यांचा विचार करावा, त्यांना विविध संधी द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्याची माहितीआता समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. यात बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जर शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी जे अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले, त्यांचा विचार करावा, त्यांना विविध संधी द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर 2 जुलैला पक्षात फूट पडली. त्यावेळी अजित पवारांवर विश्वास ठेऊन जे आले होते त्यांना टिकेचा सामना करावा लागला.
त्यामुळे ज्यांनी टीकेची झळ सोसली, त्यांच्यावर अनन्या नको, अशा भावना कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसमोर व्यक्त केल्या आहेत. तर दुसरीकडे मागील काही दिवसांत पक्षातील पदाधिकारी एकमेकांवर ज्या प्रकारे टीका करतात, त्यावरून पक्षाची नाहक बदनामी होतेय. ती थांबायला हवी, अशी वरिष्ठ भावना का वरिष्ठ पदाधिकाऱ्याने बैठकीत बोलताना व्यक्त केली आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांचे पडसाद राष्ट्रवादी अजित पवार गटात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.