Ajit Pawar Plane Crash : अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती, पूर्व विदर्भातले नेते... संजय राऊत यांचा सवाल
Ajit Pawar Plane Crash : अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती, पूर्व विदर्भातले नेते... संजय राऊत यांचा सवाल
img
वैष्णवी सांगळे
अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारातमीजवळ विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. अजित दादांच्या अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. असे असतानाच मंगळवारी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबाबत शंका उपस्थित करत अनेक खळबळजनक दावे केले आहेत.  यावेळी त्यांनी पूर्व विदर्भातील एका नेत्याचाही संदर्भ देत संशय व्यक्त केला. मात्र, त्या नेत्याचे नाव त्यांनी जाहीर केले नाही.

दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची तटस्थपणे चौकशी केली पाहिजे. सीआयडी चौकशी करणार नाही. हा तांत्रिक विषय आहे, रहस्यमय, राजकीय विषय आहे. आदल्यादिवशी एक विमान गुजरात, सूरतला जातं ते दुसऱ्यादिवशी अजित पवारांना घेऊन जाण्यासाठी बारामतीत येतं आणि कोसळतं” असं संजय राऊत म्हणाले.

“पूर्व विदर्भातले नेते कोण सांगायला पाहिजे. ते भाजपचे आहेत का? ते राष्ट्रवादीचे आहेत का? ते कुठल्या पक्षाचे आहेत? नाव सांगायला हरकत नाही. जर ते पूर्व विदर्भातले नेते अजित पवारांना मुद्दाम उशिरा येऊन भेटले असतील. त्यांचा मोटारीने जाण्याचा प्लान रद्द करायला लावला असेल. तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिज. तो नेता कोण? कुठल्या पक्षाचा आहे? अशी काय घाई होती? अशी कोणती फाईल होती, त्या फाईलवर सही केली नसती तर महाराष्ट्र थांबला असता का?” असं प्रश्न संजय राऊत यांनी विचारलेत.

याशिवाय, “अजित पवारांकडे असलेल्या भ्रष्टाचाराच्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते नेते आले होते का?” असा संशय व्यक्त करत राऊत यांनी या प्रकरणाची सर्वांगीण चौकशी करण्याची गरज अधोरेखित केली. दरम्यान, या सर्व आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाची अधिकृत चौकशी होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group