बेधडक विधानांसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रसिद्ध आहे. अजित पवारांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात अजित पवार आणि सोलापूरच्या माढा तालुक्याती डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांच्यात झालेली बातचीत व्हिडीओत कैद झाली. त्यात ते धमकीच्या स्वरात बोलतानाही दिसले.
राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरु आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये देखील मुरूम उपसा होत असल्याची तक्रार समोर आली. तहसील अधिकारी आणि डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांना ही तक्रार मिळताच, पोलील दल घेऊन त्या कारवाई करण्यासाठी तेथे पोहोचल्या. प्रशासनाची कारवाई सुरू असताना, राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ता बाबा जगताप यांनी त्यांच्या फोनवरून थेट अजित पवारांना फोन करत महिला अधिकारी अंजली कृष्णा यांच्याशी बोलणं करून दिलं.
त्या फोनवर अजित पवार म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय, तुम्ही तुमची कारवाई थांबवा आणि तिथून निघून जा, असे आदेश त्यांनी दिले. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन केला होता असे तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा. मुंबईतील वातावरण खराब आहे आणि आपल्याला तिथे प्राधान्य द्यावे लागेल. मी तुम्हाला कारवाई तात्काळ थांबवण्याचा आदेश देतो, असे त्यांनी सांगितलं.