शरद पवारांनी  विधानसभेसाठी कंबर कसली! 'शिवस्वराज्य' यात्रेचे आयोजन , वाचा सविस्तर
शरद पवारांनी विधानसभेसाठी कंबर कसली! 'शिवस्वराज्य' यात्रेचे आयोजन , वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
पुणे :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत. त्यांच्या या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आसून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा या यात्रेत सहभाग असेल. असे असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही एक यात्रा काढली जाणार आहे. आज (9 ऑगस्ट) या यात्रेचा शुभारंभ होईल. 

मिळालेल्या माहितीनुसार , आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू होत आहे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाची यात्रा पार पडेल. 

दरम्यान या यात्रेच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता जुन्नरमधील लेण्याद्री येथे पहिली सभा घेण्यात येईल. त्यानंतर आंबेगाव, खेड-आळंदी आणि शेवटची सभा भोसरी विधानसभेत संपन्न होईल. पुढील दहा दिवस ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांत पोहोचणार आहे. या यात्रेच्या शुभारंभासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एकत्र येणार आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group