शरद पवारांसोबत जाणार का? अजित पवार म्हणाले...
शरद पवारांसोबत जाणार का? अजित पवार म्हणाले...
img
दैनिक भ्रमर
राज्यात सर्व पक्षांमध्ये विधानसभेची तयारी सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष  विभागलेला गेले.

दोन्ही गटांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न नेहमी चर्चेत येत असतो. बारामतीत आपल्या पत्नीला लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभं करणं ही आपली चूक होती, असे वक्तव्य अजित पवार  यांनी केले होते. त्यामुळे येत्या काळात अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. 

अजित पवार यांनी एक वृत्तसंस्थेला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत अजित पवार यांना पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी ‘नो कमेंट्स’ असं उत्तर दिलं. अजित पवार एकीकडे महायुतीसोबत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी आखत आहेत.

दुसरीकडे आपण शरद पवार यांच्यासोबत पुन्हा राजकीय वाटचाल करणार नाही, असंदेखील स्पष्ट बोलताना दिसत नाहीयत. त्यामुळे अजित पवार यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय.

अजित पवार पुढे म्हणाले, मी आता महायुतीचा प्रचार करत आहे. मी बजेटमध्ये चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही विकास करत आहोत. आम्ही आतापर्यंत काय काम केलं, कोणत्या मतदारसंघात काय केलं याची माहिती लोकांना देत आहोत. लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून जे काही बाकी राहिलं. त्यामुळे मतदार आमच्यासोबत आला नाही. त्यांना समजावत आहोत”.
इतर बातम्या
Join Whatsapp Group