राखीपौर्णिमेनिमित्त सुप्रिया सुळेंची अजित दादांसाठी भावुक पोस्ट ! आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू....
राखीपौर्णिमेनिमित्त सुप्रिया सुळेंची अजित दादांसाठी भावुक पोस्ट ! आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू....
img
Nandini khandare More
आज रक्षाबंधनाचा सन असून सर्वत्र  हा सॅन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान आता या सणाच्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट केली आहे. 
 
सात महिन्यांपूर्वी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतरही अनेक नेते, कार्यकर्ते अजितदादांच्या आठवणी सांगत असतात. आजच्या राखी पौर्णिमेच्या सणालाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजितदादांसाठी खास पोस्ट लिहिली.

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, प्रिय दादा… आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील…तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे’.

सुप्रिया सुळे यांच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने म्हटलं की, ‘रक्षाबंधना दिवशीची खूप भावनिक पोस्ट. फोटो पाहून गलबलायला होतंय’. तर दुसऱ्या युजर्सने म्हटलं की, ‘ ताई तुमची आणि दादांची भावाबहिणीची जोडी एक वात्सल्याच प्रेमाचं आदर्श प्रतीक होतं. ताई दादांनी सर्वांना भरभरुन प्रेम दिले. आजही दादा गेलेत असे वाटतच नाही. दादांना शोधण्यासाठी मन भिरभिरतं. असे दादा पुन्हा होणेच नाही. दादा माझी राखी देखील तुमची वाट पाहते आहे’.


इतर बातम्या
Join Whatsapp Group