मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती खालावली ; पुण्यातील दौरे रद्द
मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती खालावली ; पुण्यातील दौरे रद्द
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार सध्या पुण्यात आहेत. अशातच  त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी पुढील चार दिवसांचे नियोजित दौरे रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आपल्या दौऱ्यांमुळे सक्रिय असलेल्या शरद पवार यांना अचानक आलेल्या अस्वस्थतेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी पवार हे प्रेरणास्थान असून त्यांच्या प्रकृतीविषयी सध्या तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शरद पवार यांनी आपल्या आगामी चार दिवसांचे सर्व दौरे रद्द केल्याचे स्पष्ट झाले आहे.  विधानसभेतील अपयशानंतरही त्यांनी राज्यभर दौरे करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. त्यांचे सध्याचे दौरे पक्षासाठी नवी ऊर्जा देण्यासाठी महत्त्वाचे ठरत होते. मात्र, प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी काही काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group