महाराष्ट्र अजितदादांच्या दु:खातून सावरलेला नाही.... सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई का?सूत्रं कोणाच्या हाती ? राऊतांचा खळबळजनक दावा
महाराष्ट्र अजितदादांच्या दु:खातून सावरलेला नाही.... सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई का?सूत्रं कोणाच्या हाती ? राऊतांचा खळबळजनक दावा
img
वैष्णवी सांगळे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले. अजित पवार यांचे निधन हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला मोठा हादरा बसवणारे होते. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे.  अजित दादांच्या निधनांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठे विधान केले आहे. 

या घडामोडींची सूत्रं कुणाच्या हातात आहे याविषयी त्यांनी मोठं भाष्य केलं. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील अशा बातम्या वाचल्या. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्याच्यावर आम्ही काय बोलावं. पण अजूनही महाराष्ट्र अजित पवार यांच्या दु:खातून सावरलेला नाही.त्याच्यामुळे अजितदादांच्या कुटुंबातील कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि कौटुंबिक विषय आहे.  प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय नेते आहेत. सुनील तटकरे, छगन भुजबळ हे राष्ट्रीय नेते आहेत. अशी असंख्य नेत्यांची त्यांच्या पक्षात मोठी फळी आहे. अशा नेत्यांनी निर्णय घेतला असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी होता. शेवटी हा निर्णय अमित शाह यांनी घेतला असेल असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.

अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे. त्यामुळे शरद पवार जे बोलत आहेत, ते सत्य आहे, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाविषयी कुणालाच काही माहिती नाही. तो त्यांच्या पक्षातंर्गत निर्णय आहे. भारतीय जनता पक्ष हा मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष आहे एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाला दुखवटा, दु:ख याविषयीच्या यांचा कधी संबंध आलेला नाही. त्यामुळे हे पक्ष मढ्यावरच्या टाळूवरचं लोणी खाणारे आहेत. पण ही वेळ यावर बोलण्याची नाही असे राऊत म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group