मोठी राजकीय बातमी : सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल, शरद पवारांची भेट घेतली?
मोठी राजकीय बातमी : सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल, शरद पवारांची भेट घेतली?
img
Dipali Ghadwaje
अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ सोमवारी अचानक सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातच आज अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याचं कारण शरद पवार आज पुण्यात आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे मोदीबागेत असतानाच सुनेत्रा पवार तिथे पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  

आज शरद पवार, सुप्रिया सुळे मोदीबागेतील निवासस्थानी असताना सुनेत्रा पवार देखील मोदी बागेमध्ये दाखल झाल्या होत्या. तब्बल तासभर सुनेत्रा पवार तिथे होत्या. मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांनी कोणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता आहेत. जवळपास तासभर तिथे थांबल्यानंतर सुनेत्रा पवार तेथून रवाना झाल्या. 

यावेळी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेतली का? याबद्दल चर्चा रंगली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

शरद पवार ॲक्शन मोडमध्ये
विधान परिषद निवडणुकनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवार महाराष्ट्राच्या सहा दिवस दौऱ्यावर असणार आहेत. सोमवारीत शरद पवार पुण्याला रवाना झाले. सोमवारी दुपारी तीन वाजता ते पुण्यासाठी निघाले होते. बुधवारी शरद पवार यांचा पुण्यातील बालगंधर्व येथे कार्यक्रम होणार आहे. 

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group