ब्रेकिंग! वसंत मोरे उबाठा गटाच्या वाटेवर....
ब्रेकिंग! वसंत मोरे उबाठा गटाच्या वाटेवर....
img
Dipali Ghadwaje
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वंचित बहुजन आघाडीत गेलेले वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी ते मातोश्री वर भेट घेण्यासाठी येणार असून वसंत मोरेंबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी न मिळाल्यानं वसंत मोरे यांनी वंचितकडून पुण्यात निवडणूक लढवली. लोकसभेला पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
 
वसंत मोरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेशासाठी इच्छुक असून ते आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याआधी वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारीसंदर्भात संजय राऊत यांची भेट घेतली होती. पण तेव्हा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या भेटीबद्दल बोलताना म्हटलं की, भेट घेऊ द्या काय हरकत आहे. ते कार्यकर्ते आहेत एका पक्षाचे. त्यांनी लोकसभा लढवली पुण्यात. त्यांचं सामाजिक राजकीय कार्य चांगलं आहे. आज दुपारी ते उद्धव ठाकरे साहेबांना भेटत आहेत हे खरं आहे आणि लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील हे देखील तितकच खरं आहे.

 लोकसभेला पराभव, आता वसंत मोरे पुन्हा पक्ष बदलणार?

लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर काँग्रेसने रवींद्र धंगेकरांना मैदानात उतरवलं होतं. मनसेकडून तिकीट न मिळाल्यानं वंचितमध्ये प्रवेश करून वसंत मोरे यांनी ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली. आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group