मुंबईतील भायखळा इथं एका उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय आरोपीनं 16 वर्षांच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी आग्रीपाडा पोलीस स्थानकात दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी या FIR च्या धर्तीवर आरोपीला भायखळा परिसरातूनच अटक केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , आरोपी आणि पीडिता भायखळ्य़ातील एका उच्चभ्रू इमारतीतच राहत असून, आग्रीपाडा पोलिसांच्या माहितीनुसार पीडितेचं कुटुंब इमारीत 45 व्या मजल्यावर वास्तव्यास असून आरोपीचं घर 48 व्या मजल्यावर आहे. आरोपीच्या घरात आणि इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये हा गुन्हा घडल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी पुरावा म्हणून पोलिसांनी CCTV फुटेजचा आधार घेतला आहे. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आरोपीची यापूर्वीची कोणत्याही गुन्हेगारी कृत्याची नोंद नाही.
सदर प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाची सूत्र हलली आणि त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी आणि 28 जून रोजी गुन्हा घडला.
या 35 वर्षीय आरोपीनं सुरुवाचीला पीडितेशी मैत्री केली आणि इमारतीच्याच पार्किंग लॉटमध्ये नेत तिच्यावर तिथं शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. याव्यतिरिक्त एका वृत्तसमुहाच्या माहितीनुसार आरोपीनं त्याच्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत पीडितेला घरी बोलवून लाऊंज रुममध्येही तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून,आरोपीवर POCSO कायद्याअंतर्हत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.