Nashik : किराणा दुकानातून नऊ किलो गांजा जप्त
Nashik : किराणा दुकानातून नऊ किलो गांजा जप्त
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- एका किराणा दुकानात अवैधरीत्या विक्री होणारा नऊ किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगावमध्ये जप्त केला आहे.

मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाच्या शिवारात एका किराणा दुकानामध्ये अवैधरीत्या गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने अमली पदार्थविरोधी श्‍वान पथकासह सौंदाणे गावातील श्रीगणेशा किराणा दुकानावर छापा टाकला. त्यावेळी नीलेश बापू पवार (वय 30, रा. सौंदाणे) हा अवैधरीत्या गांजाची विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातून 1 लाख 78 हजार 400 रुपये किमतीचा 8 किलो 920 ग्रॅम गांजा, 10 हजार रुपये रोख, मोबाईल, गांजा ओढण्यासाठी लागणार्‍या 50 चिलिम असा एकूण 2 लाख 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नीलेश पवार याच्याविरुद्ध मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group