Nashik : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीसह तिच्या आईची २२ लाख रुपयांची फसवणूक
Nashik : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीसह तिच्या आईची २२ लाख रुपयांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- प्रेमाचे खोटे नाटक करून तरुणीसह तिच्या आईकडून व्यवसायासाठी वेळोवेळी पैसे घेऊन ते परत न करता एका तरुणाने २१ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की २३ वर्षीय फिर्यादी तरुणी ही आयटीआय अंबड लिंक रोड, कामटवाडा परिसरात राहते. या तरुणीचे पवननगर येथे जुने ओमा हॉस्पिटल येथे ऑफिस असूून, कॉलेज रोड येथे टू बर्ड येथेसुद्धा ऑफिस आहे. या ठिकाणी आरोपी नेहूल भाऊसाहेब सोनवणे (रा. वात्सल्य अपार्टमेंट, दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, कामटवाडे) याने फिर्यादी तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले.

त्यानंतर तिच्याशी गोड बोलून व्यवसायाकरिता वेळोवेळी पैसे घेतले आहेत, तसेच फिर्यादीची राहिलेली एकूण रक्कम १६ लाख ६५ हजार व फिर्यादीच्या आईकडूनही आरोपीने घेतलेली ४ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम व्यवसायासाठी घेतली; मात्र ही रक्कम परत न करता फिर्यादीसह तिच्या आईची मिळून एकूण २१ लाख ६२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

हा प्रकार ऑक्टोबर २०२१ ते २३ मे २०२५ या कालावधीत पवननगर व कॉलेज रोड येथे फिर्यादीच्या ऑफिसमध्ये घडला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नेहूल सोनवणेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group