राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यात भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रफुल पटेल हे काही दिवसांपूर्वी 6 जनपथ येथे गेले होते. त्यावेळी काही विषयांवर चर्चा झाली होती.
आज अजित पवार, सुनेत्रा पवार, जय पवार, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ हे नेते शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले आहेत.
गेल्या वर्षी फूट पडली त्यानंतर शरद पवार यांचा वाढदिवस झाला होता, तेव्हा अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी शरद पवारांना भेटणं टाळलं होतं. मधल्या काळात छगन भुजबळ शरद पवारांना मराठा आणि ओबीसी संघर्षाच्या संदर्भात भेटण्यासाठी गेले होते.
प्रफुल पटेल 10 दिवसांपूर्वी शरद पवारांना भेटण्यासाठी गेले होते. प्रफुल पटेल हे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात समन्वयाचं काम करायचे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट जेव्हा भाजपसोबत चर्चा करत होता तेव्हा प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्या होत्या. त्यामुळं प्रफुल पटेल आणि शरद पवारांच्या भेटीनंतरची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
सातत्यानं निवडणुकीत ज्यांच्यावर टीका केली ती मंडळी कशी एकत्र येतात असा प्रश्न उपस्थित केल्यास अजित पवार यांच्याकडून 1999 मधील उदारहण दिलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावेळी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती, मात्र त्यांच्या काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं होतं.
आज शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ हे नेते आज 6 जनपथ येथे गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय होणार ते पाहावं लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांमध्ये महायुतीसोबत जाण्याबाबत सूर होता अशा चर्चा होत्या. 4 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदांरांच्या सोबत एक बैठक पार पडली होती. प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांच्या भेटीच्या बातमीनंतर राज्याच्या राजकारणात काय घडणार हे पाहावं लागेल.