ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली.
संजय राऊत म्हणाले, अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांची नाची, डान्सर, बबलीविरोधात लढाई नाही. तर ही लढाई मोदीविरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदीविरुद्ध राहुल गांधी, मोदीविरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात आहे.
ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीविषयी, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले आहेत, त्या बाईचा पराभव करणे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. तिच्या पराभवात शिवसेनेचं मोठं योगदान असलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा आदेश आहे, असं समजा आणि कामाला लागा, असं संजय राऊत यांनी जाहीर सभेत स्पष्ट केलं आहे.