VIDEO : लोकसभेची उमेदवारी मिळाली पण.....
VIDEO : लोकसभेची उमेदवारी मिळाली पण....."त्या" क्षणी नवनीत राणा ढसाढसा रडल्या
img
Dipali Ghadwaje
अमरावती : लोकसभा निवडणूक आता काही आठवड्यांवरच येऊन ठेपली आहे. अशात राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. भाजपने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेचं तिकीट जाहीर केलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. यानंतर नवनीत राणा यांनी आपल्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. यावेळी त्या भावुक झाल्या.
 
खासदर नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. खासदर नवनीत राणा या रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष होत्या. यावेळी राजीनामा देताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान नवनीत राणा भावुक झाल्या होत्या

राजीनामा दिल्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, की एका छोट्या संघटनेला मोठ्या पक्षाचं रूप देणं. एक आमदार या पक्षाने घडवला. त्याच पक्षाने खासदार बनवलं. त्याच पक्षाने एका छोट्या कार्यकर्त्याला अमरावतीची खासदार म्हणून मोठी जबाबदारी दिली. अशा पक्षाचा राजीनामा देण्याची भावना, ती धाकधुकी कायम आहे. 


आता देशासाठी काम करण्यासाठी एक नवी इनिंग सुरू करत आहे. 12 -13 वर्ष ज्या पक्षात काम केलं त्याचा राजीनामा देताना ती भावना डोळ्यातून अश्रूच्या माध्यमातून आली’ असं म्हणत त्या यावेळी भावुक झाल्या.

इतर बातम्या
Join Whatsapp Group