अमरावतीमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. घरात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. आशा घुले असं मृत महिला पोलिसाचे नाव आहे.
अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनी मध्ये ही घटना घडली आहे. आशा घुले या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? हे अद्याप अस्पष्ट आहे. आशा घुले यांचे पती देखील एस आर पी एफमध्ये कार्यरत आहेत. या घटनेचा आता पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.