क्रिकेट म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. त्यामुळे क्रिकेट विश्वाकडे चाहते डोळे लावून बसलेले असतात. आता याच क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गुरुवार 31 जुलै रोजी एक मोठी घोषणा केली आहे. काही महिन्यांपूर्वी MCA मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात आला होता. आता या स्टेडियमवर माजी क्रिकेटर आणि भारतीय कर्णधार राहिलेल्या सुनील गावसकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
हे ही वाचा...
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एक क्रिकेट म्यूजियम बनवलं जात आहे. ज्याचं नाव MCA शरद पवार क्रिकेट म्यूजियम ठेवण्यात आलं असून याचं उदघाटन ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकतं. सुनील गावसकर यांचा पुतळा या म्यूजियमवर ठेवला जाणार असून याशिवाय BCCI आणि MCA चे माजी अध्यक्ष राहिलेल्या शरद पवारांचा पुतळा सुद्धा याच म्यूजियममध्ये ठेवला जाणार आहे.