जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याविरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणात त्यांना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. 14 महिन्यानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला बलात्कार आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात रेवण्णाला दोषी ठरवले. न्यायालयाने दोषी ठरवल्याचा निर्णय देताच, रेवण्णा न्यायालयातच ढसाढसा रडू लागल्याचे सांगितले जात आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
प्रज्वल रेवण्णाच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने त्याच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. याशिवाय बंगळुरूमध्ये सार्वजनिक ठिकाणी अनेक पेन ड्राइव्ह सापडले होते. पेन ड्राइव्हमध्ये ३ हजार ते ५ हजार व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रज्वल महिलांचा लैंगिक छळ करताना दिसला. व्हिडिओंमध्ये महिलांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. प्रज्वल रेवण्णावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल झाले.
यासोबतच त्याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला सेक्स टेप प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाकडून उद्या त्याला शिक्षा जाहीर केली जाणार आहे. प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. प्रज्वलचे आजोबा पंतप्रधान, काका मुख्यमंत्री आणि वडील मंत्री होते.