मृत्यूची भेट आपल्याला कधी होईल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. व्यायाम करत असताना तरुणाला भोवळ आली अन तरुणाचा मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं ?
पिंपरी- चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करताना मिलिंद कुलकर्णी (३७ वर्ष) या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्याने ६ महिन्यांपूर्वी जिम जॉईन केली होती. अधून- मधून तो जिमला जायचा. आज सकाळी नेहमीप्रमाणे तो जिममध्ये गेला. व्यायाम करून झाल्यानंतर मिलिंदने खाली बसल्यानंतर पाणी प्यायले. अन काही सेकंदात अचानक भोवळ येऊन तो खाली पडला. जिममधील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मिलिंद कुलकर्णीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हे ही वाचा...
मिलिंद कुलकर्णीच्या पत्नी डॉक्टर आहेत. मिलिंदचे वडील, भावाचा देखील अशाच प्रकारे हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. मिलिंदच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. परिसरातही या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.